इगतपुरी तालुक्यातील शाळेच्या सहलीच्या बसला अपघात

इगतपुरी तालुक्यातील शाळेच्या सहलीच्या बसला अपघात

संगमनेर |शहर प्रतिनिधी|Sangamner

भरधाव वेगाने जाणारी शाळेच्या सहलीची बस (School Trip Bus) रस्त्यावरील गतिरोधकावर आदळल्याने झालेल्या अपघातात (Accident) सात विद्यार्थी जखमी (Student Injured) झाल्याची घटना काल रात्री संगमनेर खुर्द (Sangamner) परिसरातील हॉटेल पाहुणचार जवळ घडली.

इगतपुरी तालुक्यातील शाळेच्या सहलीच्या बसला अपघात
प्रशासन सुधारण्यासाठी अभिप्रायांचा आधार

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील कवडदरा येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ह्या शाळेच्या मुलांची सहल गेली होती. या सहलीच्या बसचा नाशिक - पुणे महामार्गावरील (Nashik Pune Highway) संगमनेर खुर्द परिसरातील पाहुणचार हॉटेल परिसरात अपघात (Accident) झाला. अपघाताची माहिती समजतात पहाटे तीन वाजता पोलीस घटनास्थळी पोहोचले.

इगतपुरी तालुक्यातील शाळेच्या सहलीच्या बसला अपघात
गुजरातच्या भामट्याला नगर सायबरकडून अटक; काय आहे प्रकरण?

पोलिसांनी जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी घुलेवाडी (Ghulewadi) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, कर्मचारी विवेक जाधव, शशिकांत दाभाडे, गवळी यांनी तात्काळ जखमी (Injured) विद्यार्थ्यांना पोलीस वाहनातून रुग्णालयात नेले.

या अपघातात (Accident) संदिप शिवाजी कोरडे, रोशन त्र्यंबक चौरे, जय आनंदा टोचे, तेजस शांताराम फोकणे, आदित्य रामभाऊ झनकर, सुरज भिमा म्हस्के, रोशन निवृत्ती शिंदे हे विद्यार्थी जखमी झाले आहेत.

इगतपुरी तालुक्यातील शाळेच्या सहलीच्या बसला अपघात
निळवंडे कालव्यांच्या कामास आता मुदतवाढ नाही

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com