आयएफबीबी मिस्टर युनिव्हर्स स्पर्धा : नगरच्या मिहीर ढसाळला गोल्ड

आयएफबीबी मिस्टर युनिव्हर्स स्पर्धा : नगरच्या मिहीर ढसाळला गोल्ड

अहमदनगर | प्रतिनिधी

शहरातील मिहीर राजेंद्र ढसाळ (Mihir Dhasal) याने पुणे (Pune) येथील बालेवाडी क्रीडा संकुलात (Balewadi Sports Complex) नुकतेच पार पडलेल्या आयएफबीबी मिस्टर युनिव्हर्स २०२२ (IFBB Mr.Universe 2022) स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक (Gold Medal) पटकाविले.

या स्पर्धेत भारतासह अनेक देशातून स्पर्धक सहभागी झाले होते. ढसाळ यांने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत मेन्स फिजिक्स मध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.

आयएफबीबी मिस्टर युनिव्हर्स स्पर्धा : नगरच्या मिहीर ढसाळला गोल्ड
पांढरी साडी अन् साधा भोळा अंदाज, पाहा 'आर्ची'चे खास फोटो

मिहीर ढसाळ हा गुलमोहर रोड येथील असून, त्याने यापुर्वी देखील शरीर सौष्ठव व मेन्स फिजिक्स स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करुन १८० सेमीच्या उंचीच्या गटात पदक मिळवले आहे. आयएफबीबी मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत त्याने केलेली कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरली आहे.

मेन्स फिजिक्स ही स्पर्धा शरीर सौष्ठव स्पर्धेसारखी असून, यामध्ये शरीर सौष्ठवपटूचा गट हा उंचीवर अवलंबून असतो. तर त्याला आपल्या बॉडीचे प्रदर्शन हाफ पँटवर करावे लागले. यामध्ये कंबरेच्या वरच्या बाजूची बॉडी पाहून गुणांकन दिले जाते.

आयएफबीबी मिस्टर युनिव्हर्स स्पर्धा : नगरच्या मिहीर ढसाळला गोल्ड
Hina Rabbani Khar : ब्युटी विथ ब्रेन! शाहबाज सरकारच्या राज्यमंत्री 'हिना रब्बानी खार' चर्चेत

Related Stories

No stories found.