फार्म भरला नाही तर रेशनकार्ड रद्द होणार

तहसिलदार प्रशांत पाटील यांची माहीती
फार्म भरला नाही तर रेशनकार्ड रद्द होणार

भोकर (वार्ताहर) -

श्रीरामपूर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानमध्ये सध्या ‘शिधापत्रिका तपासणी नमुना’ शिर्षकाखालील फार्म सर्व शिधापत्रिकाधारकांकडून

भरून घेतले जात आहेत. तो फार्म ज्या व्यक्तीकडे रेशनकार्ड आहे त्या प्रत्येकाने भरायचा आहे, तो फार्म भरून न दिल्यास संबधीत कुटूंबांचे रेशनकार्ड अपात्र ठरवून रद्द होणार आहे, अशी माहीती श्रीरामपूरचे तहसिलदार प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

सध्या अन्त्योदय, बीपीएल, केशरी, शुभ्र, अन्नपुर्णा व आस्थापना आदि प्रकारच्या शिधापत्रिका अस्तित्वात आहेत. त्या शिधापत्रिका तपासणीसाठी संबधीत सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदारामार्फत ज्या कुटूंबाकडे रेशनकार्ड आहे, त्यांनी हा फार्म भरून द्यायचा आहे. परंतू सध्या सोशल मिडीयावर याबाबत वेगळा अर्थ लावून अपप्रचार करत हा फार्म न भरण्याचे आवाहन करत चुकीची माहीती पसरविली जात आहे, असे ही तहसिलदार प्रशांत पाटील यांनी सांगीतले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com