विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम टाकल्यास मूळ उद्देशालाच हरताळ : जगताप

विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम टाकल्यास मूळ उद्देशालाच हरताळ : जगताप
संग्रहित

अस्तगाव (वार्ताहर) / Astgaon - शालेय विद्यार्थ्यांना यापुढे शाळेमध्ये मध्यान्ह भोजन न देता त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा हा मूळ उद्देशच सफल होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा न करता त्यांना स्मार्टकार्ड देऊन रास्त भाव दुकानातून आवश्यक ते खाद्य साहित्य वितरित करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांनी केली.

माध्यान्ह भोजन योजनेत शिक्षकांवर अतिरिक्त जबाबदारी येत असल्याने ही योजना पूर्वीपासूनच चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे शासनाने यापुढे माध्यान्ह भोजनासाठीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात टाकण्याची तयारी केली आहे.

लाभ थेट विद्यार्थ्यांना मिळावा हा शासनाचा उद्देश उत्तम असला तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीमध्ये ही योजना देखील अडचणीत येणारी आहे. वर्ग 1 ते 8 चे विद्यार्थी सज्ञान नसल्याने नियमानुसार त्यांना पालकांची मदत घ्यावी लागणार आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांचे अजूनही बँकेत खाते नसल्याने करोना काळात विद्यार्थी व पालकांना बँकेत येरझारा घालाव्या लागणार आहेत. ग्रामीण भागात अद्यापही आहार व इतर बाबतीत जागरूकता नसल्याने ही रक्कम आहारावरच खर्च होईल. याचीही शाश्‍वती नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्याला सकस आहार मिळावा या उद्देशालाच हरताळ फासला जाईल, अशी भीती जगताप यांनी व्यक्त केली.

राज्य सचिव सुनील गाडगे, जितेंद्र आरु, महेश पाडेकर, विजय कराळे, बाबासाहेब लोंढे, मोहम्मद शेख, रुपालीताई कुरुमकर, हनुमंत रायकर, कैलास जाधव, संभाजी पवार, सोनवणे केडी, नवनाथ घोरपडे, संतोष शेंदुरकर, सुरेश जगताप, सूर्यकांत बांदल, विलास वाघमोडे, विलास माने, राजेंद्र भगत, सचिन जासुद, अमोल चंदनशिवे, हफीज इनामदार, रामराव काळे, सिकंदर शेख, सुदर्शन ढगे, संजय तमनर, नानासाहेब काटे, मुकुंद आंचवले आदींची नावे पत्रकावर आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com