मास्कशिवाय आढळल्यास महिनाभर दुकान सील करणार

जिल्हाधिकार्‍यांचा इशारा
मास्कशिवाय आढळल्यास महिनाभर 
दुकान सील करणार

संगमनेर (शहर प्रतिनिधी) -

दुकानात मास्कशिवाय नागरीकांची उपस्थिती आढळल्यास ते दुकान महिनाभर सील करण्याचे आदेश

देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली.

संगमनेर तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी काल संगमनेरात आले होते. त्यांनी नगरपालिकेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वांनी सतर्क राहावे असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शहरातील करोनाचा आढावा घेवून संबंधीत अधिकार्‍यांना सूचना केल्या. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजकुमार जर्‍हाड, डॉ. सुरेश घोलप, डॉ. संदीप कचेरीया, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख, संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक पांडरंग पवार, घारगाव पोलीस निरीक्षक सुनिल पाटील आदी उपस्थित होते.

करोनाचा प्रादुर्भाव असतांनाही लग्न समारंभाला मोठी गर्दी होत आहे. वेगवेगळ्या दुकानांमध्ये नियम पाळले जात नाही. दुकान व मंगल कार्यालयात मास्कशिवाय कोणी आढळल्यास अशी दुकाने व मंगल कार्यालये महिनाभर सील करावे असे आदेश त्यांनी यावेळी दिले. करोनाचा प्रादुर्भाव वाढलेले असला तरी जिल्ह्यात लॉकडाऊन केले जाणार नसल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. नियमांचे पालन, मास्कचा वापर यातूनच कोविड नियंत्रणात येवू शकतो असे त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com