घायपतवाडीत मूर्ती मंदिराबाहेर आढळल्याने तणाव

गुप्तधनाच्या हेतूने प्रकार, पोलिसांचा अंदाज
घायपतवाडीत मूर्ती मंदिराबाहेर आढळल्याने तणाव

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील घायपतवाडी जवळील महामार्गालगत 50 वर्षांपूर्वीचे दत्त मंदिरातील दत्त मूर्ती मंदिराबाहेर टाकल्याचे आढल्याने खळबळ उडाली आहे. समाजकंटकांनी मूर्तीची विटंबना केल्याची चर्चा असली तरी मूर्तीखाली गुप्तधन असल्याच्या समजातून चोरट्यांनी हा प्रकार केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

घायपतवाडी येथील दत्त मंदिर हे जुने असून या मंदिरावर भाविकांची श्रद्धा आहे. याठिकाणी दत्त जयंतीला औटेवाडी, श्रीगोंदा शहर, हिरडे वाडी दांडेकर मळा, आळेकर मळा, सप्रे वाडी, कुदळे मळा, मेहत्रेमळा, आढळगाव, तसेच श्रीगोंदा बीड महामार्ग असल्यामुळे हजारो भाविक येत असतात. काही अज्ञात लोकांनी चोरीच्या उद्देशाने या मूर्तीची विटंबना करीत मूर्ती बाहेर फेकून देत मंदिरातील पितळी दोन घंटा चोरून नेल्या आहेत.

त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. भाविकांच्या भावना दुखवल्याने संताप व्यक्त होत असून लवकर या आरोपींना अटक करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. सदर घटनास्थळी पोलीस निरीक्षक ढिकले यांनी भेट देऊन चौकशी सुरू केली आहे.

हे दत्त मंदिर 50 वर्षांपासून आहे. दत्त जयंतीला हजारो भाविक येथे उत्सवास येत असतात.मूर्तीच्या खाली सोने असेल या संशयावरून अज्ञात चोरांनी मूर्ती काढून बाहेर टाकली आहे आणि मंदिरातील दोन पितळी घंटा चोरून नेल्या आहेत. श्रीगोंदा पोलिसांनी तात्काळ या आरोपींना अटक करावी.

- अनिल हिरडे, सामाजिक कार्यकर्ते

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com