‘आय लव गोंडेगाव’ नावाचा बोर्ड फोडल्याने संताप; कारवाईची मागणी

‘आय लव गोंडेगाव’ नावाचा बोर्ड फोडल्याने संताप; कारवाईची मागणी

गोंडेगाव |वार्ताहर| Gondegav

श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील ‘आय लव्ह गोंडेगाव’ नावाचा इलेक्ट्रीक बोर्ड अज्ञान समाजकंटकांनी फोडल्याने गावकर्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या समाजकंटकाविरुद्ध पोलीस प्रशसनाने कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

गावाविषयी प्रत्येकाच्या मनात आत्मीयता प्रेम निर्माण व्हावे, या उद्देशाने सरपंच सागर बढे यांनी काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रीक ‘आय लव्ह गोंडेगाव’ नावाचा बोर्ड श्रीरामपूर-पुणतांबा रोडलगत लावला आहे. यामुळे गावच्या वैभवात भर पडली आहे. तसेच हा बोर्ड रात्रीच्या वेळी अतिशय मोहक दिसत असतो. परंतू दृष्ट लागल्यासारखे काही अज्ञात लोकांना या बोर्डमुळे पोटशुळ उठला तसेच सरपंचानी गावात सत्ता आल्यापासून ‘नावासाठी नाही तर गावासाठी‘ हे निवडणुकीतील घोषवाक्य सत्यात उतविण्यासाठी गावात विकास कामाचा धडका लावला आहे.

गावाचा चेहरा-मोहरा बदलत आहे, ही गोष्ट समाज कंटकांना खटकत असावी आणि गोंडेगावकरांचे गावाविषयीचे प्रेम व्यक्त करणारा हा ‘आय लव्ह गोंडेगाव’ बोर्ड रात्रीचा फायदा घेत फोडला. त्यामुळे गावकर्‍यांनी संताप व्यक्त केला आहे. या समाजकंटका विरुद्ध पोलीस प्रशसनाने लवकरात लवकर कारवाई करावी तसेच गावची शांतता आबाधीत ठेवावी, अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.

Related Stories

No stories found.