तरस सदृष्य प्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

कुठे घडली घटना
तरस सदृष्य प्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील पिप्रीं - लौकी अजमपूर शिवारात शेतकरी रामदास विठ्ठल गिते (वय 36) यांच्यावर तरस सदृष्य प्राण्याने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.

तरस सदृष्य प्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
गायरान जमीन अतिक्रमणप्रश्नी नोटीस बजावलेल्यांवर तूर्त कारवाई करू नका

पिप्रीं - लौकी अजमपूर शिवारात शेतकरी रामदास विठ्ठल गिते यांची शेती व राहते घर आहे. रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ते आपल्या घरासमोरील पडवीत गाढ झोपलेले होते. यावेळी त्याच्यावर तरस सदृष्य प्राण्याने हल्ला केला. जोर-जोरात गिते यांनी आरडाओरड केल्यामुळे त्या हिंस्र प्राण्याने तेथून पळ काढला. त्यामुळे त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती.

तरस सदृष्य प्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
कालव्यांच्या कामाची स्थिती दोन दिवसात स्पष्ट करा

त्यामुळे तात्काळ उपचारासाठी त्यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या हल्ल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते भारतराव गिते यांनी राज्याचे महसूलमंत्री ना. विखे पाटील यांना फोनवरुन कळवताच विखे पाटील यांनी सिव्हिल रुग्णालयात फोन करुन जखमी रामदास गिते यांच्या तब्बेतीची विचारपूस केली असल्याचे भारतराव गिते यांनी सांगितले आहे.

तरस सदृष्य प्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
निळवंडेच्या कामात दिरंगाई खपवून घेणार नाही

घटनेची माहिती मिळताच सकाळी उपसरपंच दौलत दातीर, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव गिते, मनीषा अशोकराव गिते, राजू पिंजारी, सुभाष मुंढे, भाऊसाहेब वाघे, शरद बिडवे, गोरक्षनाथ वाघे, गजानन घुगे, एकनाथ गिते, सोमनाथ गिते, मनोज खेडकर, आदिनाथ मुंढे आदिंनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत गिते यांना मदतीचे आवाहन केले आहे.

तरस सदृष्य प्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
राज्यातील हजारो शिक्षकांवर कुर्‍हाड कोसळणार!

मागील अनेक वर्षापासून बिबट्याचा वावर परिसरात असल्याने शेतकर्‍याना जीव मुठीत धरुन शेतीची कामे करावी लागत आहे. अशातचं तरसासारख्या हिस्रं प्राण्याच्या हल्ल्यामुळे नागरीक दहशतीखाली असून रात्री अपरात्री शेतातील उभ्या पिकाला पाणी कसे द्याचे.? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महावितरणने शेतकर्‍याच्या वीजपंपाला दिवसा वीज पुरवठा केल्यास शेतकर्‍यांना मदत होईल. तसेच जखमी गिते हे गरीब असल्याने त्यांना शासनाने मदत करणे गरजेचे आहे.

- भारतराव गिते, सामाजिक कार्यकर्ते

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com