हैदराबादच्या साईभक्तांकडून 1 कोटी तर चेन्नईच्या भक्ताकडून 27 लाखांचे सोन्याचे आरतीचे ताट दान

हैदराबादच्या साईभक्तांकडून 1 कोटी तर चेन्नईच्या भक्ताकडून 27 लाखांचे सोन्याचे आरतीचे ताट दान

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

हैद्राबाद येथील दानशुर साईभक्त राजेश्वर यांनी आपले फर्म साई कृपा वेंचरच्या नावे श्री साईबाबा संस्थानला मेडीकल फंडकरिता रुपये 25 लाखांचे 4 डिमांड ड्राफ्ट असे एकूण 1 कोटी रुपये देणगी दिली असून या देणगीचे डिमांड ड्राफ्ट संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे सुपूर्त केले.

तसेच हैद्राबाद येथील ओम श्रीराम बिल्डर्सचे सुब्बा रेड्डी हे त्यांच्या वाढदिवासानिमित्त श्री साईबाबा हॉस्पिटलकरीता सुमारे 40 लाख रुपये किंमतीचे एक्सरे मशिन देणगी देणार असल्याचे ही राजेश्वर यांनी या वेळी सांगितले. याप्रसंगी संस्थानचे मुख्य लेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी कैलास खराडे उपस्थित होते.

याबरोबरच चेन्नई येथील देणगीदार साईभक्त श्री. व्ही. जितेंद्र यांनी 544 ग्रॅम वजनाची 27 लाख 77 हजार 664 रुपये किंमतीची सोन्याची आरतीचे ताट श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com