संकरित गायीची एक लाख 11 हजाराला विक्री

संकरित गायीची एक लाख 11 हजाराला विक्री

इंदोरी |वार्ताहर| Indori

शेतीला जोडधंदा म्हणून कुटुंबाला हातभार लावण्याचा उद्देशाने सुरू केलेल्या पशुपालनातून अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथील शेतकर्‍याने स्वतःच्या गोठ्यातील पहिलारु कालवडीला तब्बल एक लाख अकरा हजार रुपयांना व्यापार्‍यांनी विकत घेतली.

मुळा परिसरात पहिल्यांदाच इतक्या उच्चांकी रकमेची गायीची खरेदी विक्री झाल्याबद्दल दूध उत्पादकांमधून या शेतकर्‍याचे कौतुक होत आहे. मुळा खोर्‍यातील धामणगाव पाट ता. अकोले येथील दूध उत्पादक शेतकरी वैभव आनंदा भोर यांचा शेतीबरोबर दूध उत्पादनाचा जोडधंदा आहे. उत्कृष्ट नियोजन व दर्जेदार संगोपन यामुळे त्यांच्या गोठ्यातील गायी विक्रमी दूध व दर्जेदार कालवडी पाहावयास मिळतात.

श्री. भोर यांच्या गोठ्यात अडीच वर्ष वयाची पहिलारु कालवड संगमनेर येथील व्यापार्‍याने तब्बल एक लाख अकरा हजार रुपये देऊन खरेदी केली. विशेष म्हणजे आणखी दोन व्यापार्‍यांनीही ती कालवड तितक्याच रकमेला मागितली होती. मुळा पट्ट्यात प्रथमच इतक्या मोठ्या रकमेची गायीची खरेदी विक्री झाल्यामुळे दूध उत्पादकांमध्ये श्री. भोर यांचे कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com