संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

तालुक्यातील समनापूर शिवारात असणार्या ऊस तोडणी कामगारांच्या अड्ड्यातील तीन झोपड्यांना अचानक आग लागल्याने सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले.

ही घटना काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. समनापूर परिसरातील घुलेवाडी रोडवर ऊस तोडणी कामगारांचा मोठा अड्डा आहे. या अड्ड्यात 30 ते 40 झोपड्या आहेत. ऊस तोडणी कामगार सकाळी ऊस तोडण्यासाठी गेले असता काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास या अड्ड्यातील शंकर गोरक्ष बोरुडे, गोरक्षनाथ एकनाथ बोरुडे, जयराव सुखदेव खुडे यांच्या झोपड्यांना अचानक आग लागली.

या आगीत संसारोपयोगी साहित्य, कपडे, पैसे आदी जळून खाक झाले. आग लागल्याची माहिती थोरात कारखान्याला दिली. आगीची माहिती मिळताच कारखान्याचे अग्निशामक बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक व अग्नीशमक जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. कामगार तलाठी निलेश लंके यांनी जळिताचा पंचनामा केला. जळितात नुकसान झालेल्या ऊस तोडणी कामगारांना तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी होत आहे