झोपडीला आग, वृध्देचा संसार उपयोग साहित्य खाक

झोपडीला आग, वृध्देचा संसार उपयोग साहित्य खाक

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शहरातील एका पत्र्याच्या झोपडीला आग लागून झोपडीतील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. वीर सावरकर मैदानातील भाजी बाजारतळ येथे नगर परिषदेच्या इमारती जवळ शकुंतला गंगाधर पडुळकर या 65 वर्षीय वयोवृद्ध महिला पात्राच्या झोपडीमध्ये एकटी राहत असून शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास या झोपडीला आग लागून घरातील कपडे, संसार उपयोगी साहित्य व कागदपत्र जळून खाक झाले आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर बाजूलाच असलेल्या शौकत शेख व विनोद पठाण या तरुणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे प्रयत्न अयशस्वी ठरले.आगीमध्ये वयोवृद्ध महिलेचे सर्व साहित्य जळून खाक झाल्याने तिचा संपूर्ण प्रपंच उघड्यावर आला आहे. आगीची माहिती पाथर्डी नगर परिषदेच्या अग्निशामक विभागाला मिळाल्यानंतर अग्निशामक गाडीच्या साह्याने आग पूर्ण विजवण्यात आली.

येथील वयोवृद्ध महिला त्याच ठिकाणी शेतीचे लोखंडे अवजारे बनवण्याचे कष्टाचे काम करून आपली उपजीविका भागवते. पोटाची खळगी भरण्यासाठी थोड्याफार पैशावरती दररोज किराणा सामान आणू अन्नाचा प्रश्न मार्गी लागतो, त्यातच आता संपूर्ण प्रपंच भस्मसात झाल्याने या महिलेपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com