कर्जत (वार्ताहर) -

कर्जत तालुक्यातील मिरजगाव जवळील तिखी गावामधील प्रमोद कोरडे याचा त्याच्या पत्नीने बावडेकर याच्या मदतीने खून केला. याप्रकरणी त्याची पत्नी व

योगेश बावडेकर यांना न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायाधीशांनी सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस दूरक्षेत्रमधील तिखी या गावामध्ये राहणार्या प्रमोद कोरडे याचा मागील वर्षी अकस्मात मृत्यू झाला. त्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा पती हा सतत दारू पीत असे आणि एक दिवस अतिदारूच्या सेवनामुळे तो कोमामध्ये गेला आणि बेशुद्ध पडला यानंतर त्याच्यावर विकी हॉस्पिटल याठिकाणी उपचार करत असताना त्याचा मृत्यू झाला. यानंतर हॉस्पिटलने ही माहिती पोलिसांना कळवली.

पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र दरम्यान मयत पतीच्या मृत्यूबद्दल कर्जत येथील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना संशय आला व त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला संबंधित रुग्णालयांमधून कागदपत्रे घेऊन ती तपासणीसाठी नाशिक येथील लॅबमध्ये पाठवले तेथील अहवाल प्राप्त झाला आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची शंका खरी ठरली.

त्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी पत्नी व बावडेकर यांचा ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना देत गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्या दोघांवर कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणानंतर त्यांना कर्जत येथील न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायाधीशांनी सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.