पत्नीला अंधारात ठेवून दुसर्‍यांदा बोहल्यावर चढण्याचा प्रयत्न

पहिल्या पत्नीची तोफखाना पोलिसांत तक्रार
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कायद्यानुसार पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याशिवाय दुसरे लग्न करण्यास मान्यता नाही. मात्र नगरमध्ये एका व्यक्तीने पहिल्या पत्नीला अंधारात ठेवून दुसर्‍यांदा बोहल्यावर चढण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच पहिल्या पत्नीने मंडपातच राडा केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लग्नघटीका जवळ येत असताना पहिल्या पत्नीने मंडपात एंट्री केली. यावेळी एकच गोंधळ उडाला. घटस्फोट न देताच पती लग्न करत असल्याचे पाहून पहिली पत्नी संतप्त झाली. पीडित महिलेचे 12 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. अडीच वर्षांपूर्वी तिला घरातून हाकलून दिले होते. तिला अचानक माहिती मिळाली, नगरमध्ये एका हॉटेलमध्ये आपला पती लग्न करत आहे. त्यानंतर त्याला पकडून तिने पोलिसांच्या ताब्यात दिले. दिलेल्या तक्रारीवरून विशाल गोरक्षनाथ पवार (रा. बदनापूर, जि. जालना) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com