पत्नीचा खून करून पतीने केला अपघाती मृत्यूचा बनाव

पत्नीचा खून करून पतीने केला अपघाती मृत्यूचा बनाव

जिल्ह्यात कुठे घडली घटना ?

अहमदनगर|Ahmedagar

भिक्षा (Begging) मागायची नाही, या कारणातून पतीने पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण (Husband beats wife with wooden stick) करून तिचा खून (Murder) केला. वर्षा सुनील जाधव (वय 22 रा. वनकुटे ता. पारनेर) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. ही घटना नगर तालुक्यातील विळद (Vilad) पिंप्री (Pimpari) शिवारात 27 जुलै रोजी घडली. पतीने वर्षा अपघातात जखमी (Accident Injured) झाल्याने तिचा मृत्यू (Death) झाल्याचा डाव रचला होता. परंतु, पोलिसांनी केलेल्या तपासात वर्षाचा खून (Murder) झाला असल्याची बाब समोर आली. पारनेर पोलीस ठाण्याचे (Parner Police Station) पोलीस हवालदार संदीप गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) पती सुनील नबाब जाधव (वय 30 रा. विळद) याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल (Filed a murder charge) केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) सुनीलला अटक (Arrested) केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनील व वर्षा विळद (Vilad) परिसरात राहत होते. 20 जुलै रोजी वर्षा, सुनील व आणखी एक व्यक्ती दुचाकीवरून पारनेर (Parner) तालुक्यात गेले होते. वनकुटे (Vankute) रोडवर त्यांचा अपघात (Accident) झाला. या अपघातात तिघे किरकोळ जखमी (Injured) झाली होती. 27 जुलैला सुनीलने दारू पिऊन वर्षाला लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) केली. या मारहाणीत जखमी झालेल्या वर्षाला सुनील याने पुणे येथील ससून रूग्णालयात (Pune Sasun Hospital) उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान वर्षाचा मृत्यू झाला. ससून रूग्णालयातील डॉक्टरने याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तपासकामी सदरचा गुन्हा पारनेर पोलीस ठाण्यात वर्ग झाला. पोलीस हवालदार गायकवाड या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांच्या लक्षात आले की, वर्षाला मारहाण झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. गायकवाड यांनी सखोल तपास केला. पती सुनील याच्याकडे कसून चौकशी केली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने तोंड उघडले. त्याने सांगितले की, पत्नी वर्षा भिक्षा मागत होती. भिक्षा मागायला माझा विरोध होता. याच कारणातून 27 जुलै रोजी दारू पिऊन वर्षाला लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) केली. या मारहाणीत जखमी (Injured) झालेल्या वर्षाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. स्वत: गायकवाड यांनी फिर्याद दाखल करत सुनील याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे (Sub-Inspector of Police Sadashiv Kanase) करीत आहे.

उपचारादरम्यान दिला बाळाला जन्म

वर्षा साडेआठ महिन्याची गर्भवती असताना पती सुनीलने तिला मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या वर्षावर ससून रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यावेळी तिने बाळाला जन्म दिला. यानंतर ती मयत झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासादरम्यान अपघाताबाबत माहिती घेतल्यावर तिघे किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली. यामुळे संशय बळावला. गुन्ह्याचा सखोल तपास सुरू केला. यासाठी पोलीस शिपाई गवळी व टाकळी ढोकेश्वर पोलीस चौकीच्या कर्मचार्‍यांची मदत घेतली. विळदमध्ये मुक्काम ठोकला. सुनीलने मारहाण केल्यामुळेच वर्षाचा मृत्यू झाला असल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यानुसार खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

- हवालदार संदीप गायकवाड (तपासी अधिकारी)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com