चक्रीवादळामुळे 20 गावांतील 56 हेक्टरवर नुकसान

67 शेतकर्‍यांना फटका : विशेष करून आंबा पिकाला दणका
चक्रीवादळामुळे 20 गावांतील 56 हेक्टरवर नुकसान
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळ आणि जोरदार वार्‍यामुळे 20 गावातील 56 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. यात 67 शेतकर्‍यांना या वादळाचा फटका असून त्यात आंबा पिकाचे प्रमाण अधिक आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या पंचानाम्यावरून ही बाब समोर आली असून सर्वाधिक बाधित गावे ही पारनेर तालुक्यातील आहेत.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत तौक्ते चक्रीवादळ आणि जोरदार वार्‍यामुळे 20 गावांतील 56 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. कृषी विभागाने मंगळवारी केलेल्या पंचनाम्यामध्ये नगर तालुक्यातील 3 गावांत 2 हेक्टर 8 गुंठे क्षेत्रावर 4 शेतकर्‍यांचे आंबा पिकाचे, पारनेर तालुक्यातील 14 गावांत 40 हेक्टर 2 गुंठे क्षेत्रावर 51 शेतकर्‍यांचे आंबा पिकाचे, कोपरगावातील 2 गावांत 9 शेतकर्‍यांचे 7 हेक्टरवर आणि श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात 5 हेक्टर 6 गुंठे क्षेत्रावर 3 शेतकर्‍यांचे आंबा पिकाचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे.

चक्री वादळाचा महावितरणला जिल्ह्यात मोठा फटका बसला आहे. चक्री वादळामुळे जिल्ह्यातील 25 उपकेंद्रे, 344 वाहिन्यांचा, 9 हजार 341 रोहित्र आणि 552 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तर काही भागात सुरक्षेसाठी तो बंद करावा लागला होता. मात्र, कोलमडली विद्युत यंत्रणा सुरळीत करण्यसासाठी कर्मचारीही सज्ज राहून, करोना विषाणूचे संकट असताना सुरक्षितपणे काळजी घेत वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम केले.

यामुळे बंद पडलेली सर्वच 25 विद्युत उपकेंद्रे 338 वाहिन्यांचा, 9 हजार 63 रोहित्र आणि 545 गावांचा विद्युत पुरवठा मंगळवारी दुपारपर्यंत सुरु करत कोलमडलेली यंत्रणा दुरुस्त करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com