कंत्राटी कर्मचार्‍यांना बोनस न मिळाल्यास आमरण उपोषण : गोंदकर

कंत्राटी कर्मचार्‍यांना बोनस न मिळाल्यास आमरण उपोषण : गोंदकर

शिर्डी (शहर प्रतिनिधी) -

साईबाबा संस्थानमध्ये कंत्राटी कर्मचार्‍यांचे दोन महिन्यांचे तसेच 598 कर्मचार्‍यांचे तीन महिन्यांचे वेतन संस्थानने अद्याप दिलेले

नसून या कंत्राटी कर्मचार्‍यांना प्रलंबित वेतन व सानुग्रह अनुदान (बोनस) तातडीने देण्यात यावे. न मिळाल्यास आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी साईबाबा संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष श्रीकांत आणेकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

श्री. गोंदकर यांनी निवेदनात म्हटले की, संस्थानमध्ये या कंत्राटी कर्मचार्‍यांनी महिनाभर नियमित काम करून देखील पगार न देण्याची बाब कर्मचार्‍यांवर अन्यायकारक आहे.

सदर कर्मचार्‍यांचे वेतन संस्थानकडे प्रलंबित असल्याने हे सर्व कर्मचारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा व कौटुंबिक जबाबदार्‍या पूर्ण करण्यासाठी अडचण येत आहे. तसेच या कंत्राटी कर्मचारी बोनस (सानुग्रह अनुदान) देण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. या कर्मचार्‍यांना अनेक वर्षांपासून 8.33 टक्के बोनस दिला जातो. त्

मागण्यांबाबत दिनांक 5 नोव्हेंबरपर्यंत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी दिनांक 6 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 9 वाजेपासून श्री साईबाबा मंदिरासमोर आमरण उपोषण सुरू करतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, उपजिल्हाध्यक्ष अशोक पवार, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शिर्डी शहराध्यक्ष सचिन शिंदे, भाजयुमोचे प्रदेश सदस्य किरण बोर्‍हाडे, शिर्डी शहराध्यक्ष योगेश गोंदकर आदी पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com