हुमणीच्या बंदोबस्तासाठी ‘धडक’ कार्यक्रम यशस्वी करावा - डॉ. ढगे

हुमणीच्या बंदोबस्तासाठी ‘धडक’ कार्यक्रम यशस्वी करावा - डॉ. ढगे

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

हुमणीमुळे होणारे पुढील नुकसान टाळण्यासाठी आताच हुमणीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकर्‍यांनी धडक कार्यक्रम यशस्वी करावा, असे अवाहन कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोक ढगे यांनी केले.

नेवासा तालुक्यातील दिघी येथे ‘खरीप हंगामाची चाहूल’ या विषयावर आयोजित शेतकरी मेळाव्यात डॉ. ढगे बोलत होते. हुमणीपासून शेतकर्‍यांची कशी सुटका व्हावी यासंदर्भात नवीन तंत्रज्ञानाबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. सरपंच दीपक मोरे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंडल कृषी अधीकारी मनोज सूर्यवंशी, कृषी सहायक माधव तवले, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरी मोरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. पलघडमल आणि विशेषतज्ञ प्रा. चौघुले यांचा मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

कृषीकन्यांनी लाईट ट्रॅप प्रत्यक्षिक उभारून हुमणीच्या बंदोबस्ताचे तंत्र सांगितले. यात सानिका भोसले अंजली कपले, वर्षा वीरमल्लु, पठाण शफिया, मोनिका बोरुडे आणि तृप्ती सोनवणे यांनी सहभाग घेतला.दिघी गावातील शेतकरी भाऊराव भगवान ब्राम्हणे यांनी लाईट ट्रॅप व मेटारायझीम याचा वापर करून उत्तमप्रकारे नेहमी पेक्षा अधिक पीक मिळवून यश प्राप्त केले. मंडल कृषी अधिकारी मनोज सूर्यवंशी यांनी कृषी खात्याच्या विविध योजनांची माहिती दिली. कृषी सहायक नवले यांनी शेतकरी गटाच्या कार्यपद्धतीची माहिती देऊन खरीप हंगामातील पूर्वमशागतीबद्दल विवेचन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com