वैजापुरात चारचाकीच्या शोरूमला भीषण आग

वैजापुरात चारचाकीच्या शोरूमला भीषण आग

वैजापूर | प्रतिनिधी

वैजापूर शहरातील एका चारचाकीच्या शोरूमला भीषण आग लागल्याची घटना समोर येत आहे. या घटनेमुळं तालुक्यात खळबळ उडाली आहे. अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली आहे. या आगीत मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

शहरातील स्टेशन रोड परिसरातील सेंट मोनिका शाळेसमोर असलेल्या मारुती सुझुकी शोरुमला आग लागल्याची घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. आग लागल्याचं लक्षात येताच नागरिकांनी आरडाओरड सुरू केली.

त्यानंतर मोठ्या संख्येनं शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. याशिवाय, या घटनेची माहिती मिळताच डॉ.दिनेश परदेशी यांनी तत्काळ नगर पालिकेचे अग्निशामक दलास पाचारण केले,अग्निशामक दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांनी आग आटोक्यात आणली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com