किती आहे जायकवाडी धरणात पाणीसाठा?, वाचा आजचे अपडेट

किती आहे जायकवाडी धरणात पाणीसाठा?, वाचा आजचे अपडेट

पैठण (प्रतिनिधी)

आशिया (Asia) खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण (Earthen dam) असलेल्या मराठवाड्यातील (Marathwada) पैठणच्या (Paithan) जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) संथगतीने पाणी पातळी वाढत असून रविवारी (५ सप्टेंबर) रोजी १५२२ फुट पाणी साठवण क्षमतेच्या या जलाशयातील पाणी साठा (water storage) जवळपास ४४.८० टक्केपर्यंत पोहचला.

जायकवाडी धरणाच्या (Jayakwadi dam water storage) पाणलोट क्षेत्रातील औरंगाबाद, अहमदनगर, जिल्ह्यातील गेल्या दोन ते चार दिवसा पासून जोरदार झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात आज दि. ५ सप्टेंबर रोजीची पाणी पातळी फुटामध्ये १५१० .१९ इतकी आहे, तर मीटरमध्ये ४६०.३०६ असुन एकुण पाणीसाठा १७१०.८४६ दलघमी आहे, जिवंत पाणीसाठा ९७२.७४० दलघमी ईतका आहे. टक्केवारी ४४.८० टक्के आहे.

मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त पाणीसाठा २११८.३९४ दलघमी इतका होता, मागील वर्षी आजच्या दिवसाची उपयुक्त टक्केवारी ९७.५७% इतकी होती, आजचे पर्जन्यमान निंरक असुन एकुण पर्जन्यमान ५४६ आहे, बाष्पीभवन निरंक. पाण्याची आवक ६ हजार १७५ क्यूसेक्स इतकी आहे. तर दुसरीकडे पैठण तालुक्यातील शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com