दीड लाख रोख रकमेसह 60 हजार रुपयांची दारु चोरी

दीड लाख रोख रकमेसह 60 हजार रुपयांची दारु चोरी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

अज्ञात चोरट्याने हॉटेलचे (Hotel) कुलूप तोडून गण्या मधील दीड लाख रुपयांच्या रोख रकमेसह 60 हजार रुपयांच्या विदेशी दारूची चोरी (Theft of Foreign Liquor) केल्याची घटना शहरातील अकोले नाका (Akole Naka) परिसरातील हॉटेल राज पॅलेसमध्ये सोमवारी रात्री घडली.

संगमनेर नगरपालिकेचे (Sangamner Municipality) माजी नगरसेवक निलेश जाजू यांच्या मालकीचे अकोले नाका (Akole Naka) परिसरात राज पॅलेस हे हॉटेल आहे. अज्ञात चोरट्याने सोमवारी रात्री हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या भिंतीवरील खिडकी तोडून हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्याने काऊंटर चे कुलूप तोडून दीड लाख रुपये रोकड व 60 हजार रुपयांच्या विदेशी दारू चोरी केली.

दुसर्‍यादिवशी हॉटेलचे व्यवस्थापक भागेश नंदकिशोर ओझा हे कामावर आले असता काऊंटरचे कुलूप तोडले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पाहणी केली असता दीड लाख रुपयांची रोकड गायब (Cash Theft) असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याने हॉटेलचे मालक निलेश जाजू यांना या चोरीची कल्पना दिली. श्री. जाजू यांनी हॉटेलमध्ये येऊन पाहणी केली असता अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह विदेशी दारूच्या (Foreign Liquor))बाटल्या चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर हॉटेलचे व्यवस्थापक ओझा यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com