हॉटेल कामगारांना मारहाण करणारे पाच अटकेत

हॉटेल कामगारांना मारहाण करणारे पाच अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

हॉटेलमधील कामगारांना (Hotel Worker) दहशत (Terror) करून गंभीर दुखापत करणार्‍या पाच जणांना भिंगार कॅम्प पोलिसांनी (Bhingar Camp Police) वडारवाडी परिसरातून ताब्यात घेत अटक केली आहे.

हॉटेल कामगारांना मारहाण करणारे पाच अटकेत
धक्कादायक ! कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

राहुल साहेबराव शिंदे (रा. साईनगर, माधवबाग, भिंगार), आकाश संजय पवार (रा. ब्रम्हतळे, नागरदेवळे), निखील अश्विन घोरपडे (रा. भुमेश्वर कॉलनी, भिंगार), राहुल अनिल शिंदे (रा. श्रीराम कॉलनी, भिंगार), राहुल उत्तम काळे (रा. महेशनगर, भिंगार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण 13 सप्टेंबर रोजी दुपारी हॉटेल प्रकाश येथे जेवण करण्यासाठी आले होते. त्यांनी हॉटेल मधील कामगारांना मारहाण (Beating) केली होती. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला होता.

हॉटेल कामगारांना मारहाण करणारे पाच अटकेत
एकलहरे-बेलापूर रस्त्यावर दरोडा; तरुणाची निर्घृणपणे हत्या, पत्नीला जबर मारहाण

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून मारहाण (Beating) करणारे पसार होते. ते वडारवाडी परिसरात आले असल्याची माहिती सहा.पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अंमलदार कैलास सोनार, गोविंद गोल्हार, संदीप घोडके, दहिफळे, दिलीप शिंदे, अमोल आव्हाड यांचे पथक पाठविले. पथकाने संशयित आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे.

हॉटेल कामगारांना मारहाण करणारे पाच अटकेत
पालकमंत्रीच रहा, मालक बनू नका
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com