हॉटेल मालकासह ग्राहकाला रॉड, फायटरने मारहाण

वाडियापार्क येथील घटना || तिघांविरूध्द गुन्हा
हॉटेल मालकासह ग्राहकाला रॉड, फायटरने मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बिर्याणी हाऊसमध्ये घुसून तिघांनी मालकासह ग्राहकाला लोखंडी रॉड, फायटरने मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री वाडियापार्कच्या गेट नंबर पाच येथे घडली. मारहाणीत बिर्याणी हाऊसचे मालक जगदीश रामचंद्र धारक (वय 35 रा. दातरंगे मळा, नगर) व ग्राहक अभिजित अरुण अबनावे (रा.न्यू टिळक रोड, नगर) जखमी झाले आहेत.

जखमी जगदीश धारक यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून समीर ख्वाजा शेख व त्याच्यासोबतचे इतर दोघे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी धारक हे रविवारी रात्री त्यांच्या वाडियापार्क येथील हॉटेल भूमी बिर्याणी येथे असताना समीर ख्वाजा शेख व त्याच्यासोबत इतर दोघेजण तेथे आले.

त्यांनी मागील किरकोळ भांडणावरून धारक यांना शिवीगाळ करत तुला येथे दुकान चालवून देणार नाही, तुझ्याकडे पाहून घेईल, असे म्हणून लोखंडी रॉडने मारहाण केली. हॉटेलमधील ग्राहक अभिजित अबनावे यांना देखील शेख व त्याच्या साथीदारांनी काही एक कारण नसताना फायटरने मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com