शॉपिंग मॉल्सवरील बंदी कायम, मात्र उद्यापासून  हॉटेल-लॉज सुरू
सार्वमत

शॉपिंग मॉल्सवरील बंदी कायम, मात्र उद्यापासून हॉटेल-लॉज सुरू

जिल्हा प्रशासन : कन्टेन्टमेंट झोन वगळता 33 टक्के क्षमतेचा वापर करता येणार

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यातील शॉपिंग मॉल्स वगळता हॉटेल्स, लॉजेस, गेस्ट हाऊस आदी आस्थापना त्यांच्या 33 टक्के क्षमतेने विविध अटी व शर्तींचे काटेकोर पालन करत उद्या (दि. 8) सुरू करता येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. कन्टेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी या आस्थापना सुरु करता येतील, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

या आदेशात ज्या आस्थापनांचा जिल्हा-नगरपालिका प्रशासनाकडून क्वारंटाईन सुविधांसाठी वापर केला जात आहे, अशा ठिकाणी आस्थापनांमधील 33 टक्के क्षमता वगळता उर्वरित क्षमतेचा (67 टक्के) अथवा पूर्ण क्षमतेचा जिल्ह व नगरपालिका प्रशासनाव्दारे अशा सुविधांसाठी वापर केला जावू शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

उद्यापासून परवानगी असणार्‍या हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस इत्यादी आस्थापना यांनी दर्शनी भागांत कोव्हीड 19 च्या प्रतिबंधात्मक उपायांसंबंधी पोस्टर्स, स्टॅडिज, ऑडिओ व्हिज्यूअल मिडीयाव्दारे मार्गदर्शक तत्वे दर्शविणे आवश्यक आहे

Deshdoot
www.deshdoot.com