
कोतूळ |वार्ताहर| Kotul
अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथील हॉटेल मराठा दरबार या ठिकाणी सुरू असलेली अवैध दारू विक्री धामणगाव पाट ग्रामस्थांनी बंद पाडली. अकोले पंचायत समितीचे माजी सभापती भानुदास गायकर यांच्या मालकीचे हे हॉटेल आहे.
अवैधरित्या विकल्या जाणार्या दारूचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला. ग्रामस्थांनी अचानक हल्ला बोल करत या हॉटेलवर छापा टाकला. आज धामणगाव पाटमध्ये ग्रामसभा होती. ग्रामपंचयतची परवानगी व घेता भानुदास गायकर यांनी हॉटेल मराठा दरबार धामणगाव पाट येथे अवैध दारू विकली जात आहे. ती बंद करण्याचा ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन ग्रामस्थांनी हॉटेलवर जाऊन ही दारू विक्री बंद पाडली.
याबाबत ग्रामस्थांनी अकोले पोलिसांना संपर्क साधून ही माहिती दिली असता अकोले पोलीस स्टेशनचे एपीआय घुगे यांनी घटनास्थळी भेट दिली.
अवैधरित्या चालवल्या जाणार्या हॉटेलची ग्रामपंचायत कडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही ग्रामस्थांकडून या प्रकरणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.