हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या

विहिरीत आढळला मृतदेह
हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी (Savedi) उपनगरातील एका हॉटेल व्यावसायिकाने (Hotel Businessman) विहिरीत आत्महत्या (Well Suicide) केली. अनिल तुकाराम ढवण (वय 42 रा. ढवण वस्ती तपोवन रोड, सावेडी) असे मयत हॉटेल व्यावसायिकाचे (Hotel Businessman) नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल ढवण यांचे तपोवन रोडवर (Tapovan Road) हॉटेल आहे. ते रविवारी रात्रीपासून बेपत्ता होते. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला परंतू ते मिळून आले नाही.

सोमवारी सकाळी नातेवाईकांनी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) बेपत्ता झाल्याची तक्रार (Missing Reported) दिली होती. सोमवारी दुपारी अनिल यांचा मृतदेह तपोवन रोड (Tapovan Road) परिसरातील कादंबरी नगरी येथील विहीरीत (Well) असल्याची खबर मिळाली होती. त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली असता रात्री उशिरा विहिरीमध्ये त्यांचा मृतदेह मिळून आला. त्यांचा चुलत भाऊ सतिश सखाराम ढवण यांनी मृतदेह (Dead Body) जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केला. तेथे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

दरम्यान अनिल ढवण यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप कारण समोर आले नाही. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस अंमलदार बाळासाहेब गिरी हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com