आता हॉस्पिटललाच होणार रेमडेसिवरचा पुरवठा

आता हॉस्पिटललाच होणार रेमडेसिवरचा पुरवठा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात अत्यावस्थ करोना रुग्णांना आता रेमडेसीवर या इंजेक्शनचा पुरवठा हा अन्न औषध विभागामार्फत उपचार सुरू असणार्‍या संबंधीत हॉस्पिटला होणार आहे.

जिल्ह्यातील प्रमुख पुरवठार यांच्याकडे येणार्‍या या इंजेक्शनच्या साठ्याची माहिती त्यांनी जिल्हा प्रशासनाला सादर करणे बंधनकारक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बुधवारी दिली.

करोना बाधित रुग्ण अत्यावस्था झाल्यावर त्याला रेमडीसीवर हे इंजेक्शन महत्वाचे आहे. या इंजेक्शनचे डेपो हे पुण्यात असून यापूर्वी जिल्हा प्रशासनाने या इंजेक्शनचे जिल्ह्यात समप्रमाणात वाटप करण्याचे आदेश दिले होते. जिल्ह्यात या इंजेक्शनचे प्रमुख 12 वितरक असून यातील सहा वितरक हे नगर शहरातील आहेत.

यापुढे जिल्ह्यात येणार्‍या या इंजेक्शनच्या साठ्याची माहिती जिल्हा प्रशासनाला सादर करणे बंधनकारक करण्यात आली असून त्यानंतर अन्न-औषध प्रशासन त्याचे मागणीनूसार हॉस्पिटला वितरण करणार आहे. यापुढे हे इंजेक्शन मार्केटमध्ये असणार्‍या मेडिकलमध्ये उपलब्ध होणार नाही.

यामुळे करोना उपचार करणार्‍या डॉक्टरांनी गरजेनूसार त्यांची मागणी अन्न-औषध विभागाकडे नोंदवून त्यांच्याकडून हे इंजेक्शन घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com