हॉस्पिटलची माहिती एका क्लिकवर ; शिर्डीकरांसाठी स्वतंत्र अ‍ॅप

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रयोग
हॉस्पिटलची माहिती एका क्लिकवर ; शिर्डीकरांसाठी स्वतंत्र अ‍ॅप

अहमदनगर (प्रतिनिधी) - करोना पॉझिटिव्ह रिपोर्टनंतर बेडची माहिती व्यवस्थित न मिळाल्याने रुग्ण घाबरून जातात. पण आता शिर्डीकरांची ही चिंता मिटली आहे. माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका क्लिकवर हॉस्पिटलची माहिती मतदारसंघातील नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी खास अ‍ॅप तयार केले आहे.

राहाता तालुक्यात असलेली कोव्हीड रुग्णालय, कोव्हीड केअर सेंटर यांची माहीती रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अ‍ॅपच्या माध्यमातून सहज मिळणार आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर बाधितांसाठी बेड शोधण्याची धावपळ नातेवाईकांना करावी लागते. नातेवाईकांची ही धावपळ कमी व्हावी म्हणून, रुग्णालयांची परिपूर्ण माहीती असलेले अ‍ॅप्सची सुविधा सुरु करण्यात आली आहे. थोड्याच दिवसात नागरीकांना मोबाईलवर या अ‍ॅप्सची सुविधा मिळणार असल्याचे आ.विखे पाटील यांनी सांगितले.

नागरीकांचे प्रबोधन व्हावे म्हणून या अ‍ॅप्सच्या माध्यमातून या नवीन आजाराची लक्षणे आणि उपचारांबाबतची माहीती दिली जाणार असून, शिर्डी संस्थानच्या रुग्णालयात स्वतंत्र विभाग आणि तंज्ञ डॉक्टरांचा टास्कफोर्स निर्माण करण्याबाबतही आपण सुचित केले असल्याचे आ.विखे पाटील यांनी सांगितले.

लसीकरण, सर्वेक्षणासाठीही वापर

राहाता तालुक्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात असलेले बेड, ऑक्सीजन बेड, व्हेन्टीलेटर बेड तसेच उपलब्ध असलेल्या सुविधांची माहीती प्रत्येक दिवशी अपडेट केली जाणार आहे. भविष्यात या अ‍ॅप्सच्या माध्यमातून लसीकरण मोहीमेची माहीतीही नागरीकांना मिळेल. गावनिहाय, तसेच शहरांमध्ये प्रभागनिहाय नागरीकांना लसीकरणाची माहीती दररोज उपलब्ध होईल, असे आ.विखे पाटील यांनी सांगितले. या अ‍ॅप्सच्या सहकार्याने तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या सहकार्याने मतदार संघातील कुटूंबाचे सर्वेक्षण करुन, 6 महिन्यात नागरीकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा मानस असल्याचे आ.विखे पाटील म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com