जामखेड : हॉस्पिटल बिलाच्या वादातून कुर्‍हाडीने वार
सार्वमत

जामखेड : हॉस्पिटल बिलाच्या वादातून कुर्‍हाडीने वार

दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

सार्वमत

जामखेड (तालुका प्रतिनिधी ) - अपघातामुळे झालेल्या हॉस्पिटल च्या बिलाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील तेलंगशी या ठिकाणी एका जणावर कुर्‍हाडीने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी दोघा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी ज्ञानेश्वर केरबा ढाळे राहणार तेलंगशी याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी तानाजी विठ्ठल पांडुळे व विठ्ठल खेमा पांडुळे दोघे राहणार तेलंगशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 27 रोजी सकाळी तेलंगशी गावातील वेशीजवळ फीर्यादी हा दूध घालण्यासाठी तेलंगशी गावात आला होता याच दरम्यान फीर्यादी हा वेशीजवळ थांबलेला असताना त्यावेळी वरील आरोपी यांनी फीर्यादी च्या जवळ जाऊन फिर्यादीस म्हणाले की तू अहमदनगर येथील हॉस्पिटल मधिल अपघातांमध्ये झालेल्या खर्चाची रक्कम का देत नाही असे म्हणून आरोपी नंबर एक याने त्याच्या हातातील कुर्‍हाडीने फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली तसेच आरोपी नंबर दोन यांने आरोपी नंबर एक च्या हातातील कुर्हाड हिसकावून घेऊन त्याच कुर्‍हाडीने फीर्यादीवर कुर्‍हाडीने वार करून फिर्यादीच्या छातीवर मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत फीर्यादी हा स्वतःहा जखमी झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अवतारसिंग चव्हाण हे करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com