
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
टांग्याला घोडा जुपुन शर्यत काढणार्या तिघांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादवि कलम 188, 269, 270 सह प्राण्यांना क्रुरपणे वागणूक
कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. बंडू दंगु बडे, रावसाहेब दंगु बडे (दोघे रा. मेहकरी ता. नगर) व प्रकाश मच्छिंद्र पोटे (रा. बारदरी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून 60 हजार रूपये किंमतीचे तीन टांगे पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलीस नाईक सचिन गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. कल्याण रोडवरील हिंगणगाव फाट्यावर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता पोलिसांनी ही कारवाई केली.
आरोपी यांनी सकाळी टांग्याला घोडा जुपुन त्यांना चाबुकाने क्रुरपणे मारहाण करून शर्यत काढली. या प्रकरणाची माहिती एमआयडीसीचे सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे यांना मिळताच त्यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन आरोपींकडील टांगे जप्त केले. तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार लाळगे करीत आहे.