बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू

पारनेर | तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील किन्ही, बहिरोबावाडी परिसरात गेली पाच-सहा महिन्यांपासून दोन बिबट्यांचा वावर आहे. या बिबट्यांनी आतापर्यंत अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले केलेले आहेत. बिबट्याचे किन्ही, बहिरोबावाडी परिसरात नित्यनेमाने वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांना दर्शन होत आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

सोमवारी राञी किन्ही येथे कान्हुर रोडवरील किनकर वस्तीलगत असलेल्या कैलास किनकर या शेतकऱ्याच्या शेतात गाजदिपुर येथील मेंढपाळ बांधव नामदेव करगळ यांचा मेंढ्यांचा वाडा मुक्कामी असताना बिबट्याने राञी अचानक करगळ यांच्या घोड्यावर हल्ला केला. या हल्ल्यात घोडा मरण पावले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

सदर घटनेची माहिती वन विभागास शेतकरी नेते अनिल देठे पाटील, सरपंच पुष्पा खोडदे, उपसरपंच हरेराम खोडदे यांनी तात्काळ देत या घटनेचा पंचनामा करून संबंधित मेंढपाळ बांधवास वन विभागाने आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून
किन्ही , बहिरोबावाडी परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असुन, त्यांच्या उपद्रवामुळे नागरिक ञस्त झालेले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून आतापर्यंत बिबट्यांकडुन अनेक पाळीव प्राण्यांना लक्ष्य केले गेले आहे. वन विभागाने या परिसरात एकच पिंजरा लावलेला आहे. एका पिंजऱ्यांने बिबट्याला जेरबंद करणे अशक्य आहे. त्यामुळे या भागात अजुन पिंजरे लावण्याची आवश्यकता आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?
बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com