पोलिसांचा हुक्का पार्लरवर छापा

एक जण ताब्यात || साडेआठ हजाराचा मुद्देमाल जप्त
पोलिसांचा हुक्का पार्लरवर छापा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बालिकाश्रम रोडवरील न्यु आर्टस कॉलेजच्या समोर गाळ्याच्या वरती एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणी हुक्का पार्लरचा मालक अमिन इकबाल शेख (वय 21 रा. शिवाजीनगर, कल्याण रोड) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अंमलदार संदीप गिर्‍हे यांनी फिर्याद दिली आहे. बालिकाश्रम रोडवर स्टार बर्ग नावाचे हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, गिर्‍हे यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. पथकाने सोमवारी सायंकाळी बातमीतील नमूद ठिकाणी जावून पाहणी केली असता एका पत्र्याच्या शेडमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांना पाहताच तेथे असलेले इसम इमारतीवरून उड्या मारून पळून गेले. पोलिसांनी अमिल इकबाल शेख याला ताब्यात घेतले. हुक्का पिण्यासाठी लागणारे साहित्य व साधने असा आठ हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com