VIDEO : निवड पद्धतीतील बदल योग्यच

ना.थोरात : राज्य सरकारचा निर्णय कायदशीर
VIDEO : निवड पद्धतीतील बदल योग्यच
मंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर | Ahmednagar

अध्यक्ष निवडीसाठी महाराष्ट्र विधानसभा नियमात केलेला बदल हा योग्यच आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

मंत्री बाळासाहेब थोरात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या 'त्या' पत्राने राज्यपाल दुखावले, म्हणाले...

नगर येथे माध्यमांशी बोलताना महसूलमंत्री म्हणाले, लोकसभेत ज्या पद्धतीने अध्यक्षांची निवड होते, त्या पद्धतीने निवडीची पद्धत आपण केली आहे. संसदेत पंतप्रधान निवडीसाठी राष्ट्रपतींकडे शिफारस करतात, येथे मुख्यमंत्री राज्यपालांना त्याच पद्धतीने शिफारस करतात. यात राज्य सरकारने कोणतीही घटनात्मक चूक केलेली नाही. मात्र तरिही राज्यपालांना यात काही त्रूटी दिसतात. हे विचारांचे मतभेद आहेत.

मंत्री बाळासाहेब थोरात
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचे कोणते शब्द आवडले किंवा नावडले याची माहिती नाही. मात्र आमचा निर्णय कायदेशीर आहे. शेवटी राज्यपालांचा मान राखण्यासाठी निवड टाळली आहे. नव्या नियमांमुळे कोणत्याही सभागृहातील सदस्याला पक्षाची भुमिका मान्य करावी लागते. त्यामुळे जवळपास सर्वच सभागृहांत आवाजी मतदानाची पद्धत स्वीकारण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकार काही वेगळे करत आहे असे नाही, असे त्यांनी सांगीतले.

मंत्री बाळासाहेब थोरात
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com