हनीट्रॅपमधील आणखी एकास अटक

चारचाकी वाहन जप्त; तरूणीसह एजंट मोरेला 24 मे पर्यंत कोठडी
हनीट्रॅपमधील आणखी एकास अटक

अहमदनगर (प्रतिनिधी) - नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणलेल्या हनीट्रॅप प्रकरणी आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. बापू बन्सी सोनवणे (रा. हिंगणगाव ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी त्याचे चारचाकी वाहन जप्त केले आहे. सोनवणे याचा बागतदारावर केलेल्या हनीट्रॅपमध्क्या सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणर आहे. दरम्यान, तरूणीसह तीचा एजंट अमोल सुरेश मोरे यांना गुरूवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पहिल्याच गुन्ह्यात 24 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

नगर तालुका पोलिसांनी हनीट्रॅप प्रकरण उघडकीस आणले. याची पहिली फिर्याद तालुक्यातील एका बागतदाराने दिली. यानंतर एक क्लासवन अधिकारी यात अडकल्याचे समोर आले. त्याने हिंमत दाखवित फिर्याद दिली. सुरूवातीला संबंधीत तरूणीसह तीचा एजंट मोरे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यात आता आरोपींची संख्या वाढत आहे. दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यात संबंधीत तरूणीसह एजंट मोरे व त्यांना मदत करणारे सचिन भिमराज खेसे, सागर खरमाळे, महेश बागले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील खरमाळे व बागले पसार आहेत. दरम्यान, या गुन्ह्यात बापू सोनवणे याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्याने त्या बागतदाराची ओळख संबंधीत तरूणीसोबत करून दिली. यानंतर त्यांनी प्लॅन करून त्याला यात अडकविले.

तरूणीच्या घरातून महत्वाची कागदपत्रे हाती

संबंधीत तरूणीच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असून, या ठिकाणी काही महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. यात बँकेचे कागदपत्र सुद्धा पोलिसांनी हस्तगत केले आहेत. तसेच तिच्याकडे असलेल्या मोबाईल वरून तिने आतापर्यंत कोणाकोणाला कशा कशा पद्धतीने संपर्क केला, तसेच तिच्याकडे कोणकोणते व्हिडिओ आहे. याचा पोलिसांनी आता शोध सुरू केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com