घरपट्टीच्या सवलतीसाठी लोकअदालतमध्ये भाग घ्यावा

घरपट्टी वसुलीबाबत आढावा बैठक
घरपट्टीच्या सवलतीसाठी लोकअदालतमध्ये भाग घ्यावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या महिन्यामध्ये लोकअदालतद्वारे घरपट्टी संदर्भातील अडचणी सोडवून मालमत्ताधारकांना दिलासा देण्यात आला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घरपट्टी भरली. याच धर्तीवर 25 सप्टेंबर रोजी मनपाच्यावतीने घरपट्टी संदर्भात लोकअदालत घेण्यात येणार असून त्यामध्ये थकबाकीदारांना 75 टक्के शास्ती माफी मिळेल. याकरिता नागरिकांनी लोकअदालतमध्ये भाग घेण्यासाठी संबंधित प्रभाग अधिकारी यांचेशी संपर्क साधून अर्ज सादर करावेत, असे आवाहन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले आहे.

महापौर शेंडगे यांनी मनपा हद्दीतील घरपट्टी व पाणीपट्टी वसुली संदर्भात सोमवारी आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्त शंकर गोरे, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले आदी उपस्थित होते. यावेळी महापौर शेंडगे म्हणाल्या की, सद्यस्थितीत वसुली कमी प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. बरेच नागरिक घरपट्टी भरण्यास तयार असतात. त्यांच्याकडे वसुली लिपीक जात नाही.

वसुली लिपीक प्रभागामध्ये फिरून मालमत्ताधारकांना घरपट्टी भरणे बाबत प्रोत्साहित केल्यास मालमत्ताधारक घरपट्टी भरतील. नागरिकांच्या घरपट्टी संदर्भात असलेल्या अडचणी सोडविणे बाबत वसुली लिपीक यांनी कार्यवाही करावी. त्यामुळे देखील भरणा वाढण्यास मदत होईल. ऑगस्ट अखेर 21 कोटी वसुली झाली असून यापुढील काळात जास्तीत जास्त घरपट्टी वसुली बाबत कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com