घरावर वीज कोसळून नुकसान

घरावर वीज कोसळून नुकसान

कुटुंबिय बालंबाल बचावले

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यात रविवारी झालेल्या जोरदार पावसामध्ये वडनेर हवेली येथील सुभाष बबन बढे यांच्या घरावर रात्री साडेनऊच्या दरम्यान वीज कोसळली. यामुळे संसारपयोगी वस्तु जळाल्या तसेच घराचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेजारच्या खोलीमध्ये हे कुटुंब झोपलेले असल्यामुळे या दुर्घटनेत कुटुंब बालंबाल बचावलेे.

रविवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान अचानक विजेचा कडकडाट होऊन घरावर मोठा विजेचा लोळ पडला. यात घरातील संपूर्ण संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून घर पूर्णपणे उध्वस्त झाले. सुभाष बबन बढे व त्यांचे कुटुंबिय शेजारच्या खोलीत झोपलेले असल्याने बचावले. कामगार तलाठी मोहिनी साळवे यांनी पंचनामा केला आहे. रविवारी रात्री दोनच्या दरम्यान वडनेर हवेली परिसरात झालेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती सरपंच लहु भालेकर यांनी दिली आहे. तसेच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाच्यावतीने तातडीने करण्याची मागणी करण्यात आली.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामध्ये शोभा वसंत भालेकर या विधवा महिलेच्या घराची मोठे नुकसान झाले होते. यासंबंधीचा महसूल यंत्रणेच्यावतीने पंचनामा करण्यात आलेला आहे परंतु, दोन महिने उलटूनही या विधवा महिलेला उद्यापर्यंत आपत्कालीन विभाग किंवा महसुली यंत्रणेच्यावतीने कोणत्याही प्रकारची मदत देण्यात आलेली नाही.

- लहु भालेकर, सरपंच वडनेर हवेली

Related Stories

No stories found.