घरात ठेवलेले मैत्रिणीचे दीड तोळे लंपास

महिलेची पोलिसांत फिर्याद
घरात ठेवलेले मैत्रिणीचे दीड तोळे लंपास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घरफोडून (Burglary) दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने (Gold Ornaments) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. बुरूडगाव रोडवरील (Burudgav Road) चंदन इस्टेटजवळ शनिवारी रात्री साडेअकरा ते रविवारी सकाळी सात वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल (Filed a Case) झाला आहे. छाया किरण ताठे (वय 40) यांनी फिर्याद दिली आहे.

घरात ठेवलेले मैत्रिणीचे दीड तोळे लंपास
शेततळ्यात बुडून शेतकर्‍याचा मृत्यू

फिर्यादी यांची आई मिराबाई चंद्रकांत एकाडे यांची मैत्रिण सरस्वती मारूती ढगे (रा. शेरकरगल्ली, सर्जेपुरा) यांनी त्यांच्याकडील दीड तोळ्याचे सोन्याचे (Gold) डोरले मिराबाई यांच्याकडे ठेवण्यासाठी दिले होते. त्यांनी ते दागिणे (Gold Ornaments) कपाटातील लॉकरमध्ये ठेवले होते. फिर्यादी यांनी शनिवारी रात्री साडेअकरा वाजता घर बंद केले होते. यानंतर त्यांनी सकाळी पाहिले तर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले.

घरात ठेवलेले मैत्रिणीचे दीड तोळे लंपास
नागरदेवळे नगरपरिषदेच्या घनकचरा डेपोसाठी 12 एकर जागेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

त्यांनी कपाटात पाहणी केली असता दीड तोळ्याचे दागिणे चोरीला (Gold Ornaments Theft) गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी रविवारी दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार ढगे करीत आहेत.

घरात ठेवलेले मैत्रिणीचे दीड तोळे लंपास
ऑडिटरच्या उपस्थितीत होणार 15 कोटींचे वाटप

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com