विजपुरवठा
विजपुरवठा
सार्वमत

नेवासाफाटा : घरगुती व व्यावसायिक विजपुरवठा होणार लवकरच स्वतंत्र

निर्णयाचे व्यावसायिकांकडून स्वागत

Arvind Arkhade

नेवासा फाटा|वार्ताहर| Newasa Phata

महावितरण कंपनीकडून नेवासाफाटा येथील घरगुती व व्यावसायिकांसाठी स्वतंत्र विद्युत पुरवठा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु झाली असून काही दिवसांतच नेवासा फाटा येथील विद्युत पुरवठा स्वतंत्र होणार असल्याची माहिती कंपनीचे उपकार्यकारी अभियंता शरद चेचर यांनी दिली.

नेवासा फाटा येथील घरगुती व व्यावसायिक विज ग्राहकांना दिवसातून अनेक वेळेस तांत्रिक बिघाडाला सामोरे जावे लागत होते. विजेचा सतत लपंडाव चालू असल्यामुळे व्यवसायात मोठा तोटा सहन करण्याची वेळ विज ग्राहकांवर येत होती. त्यामुळे इंदिरा काँग्रेस पक्षाच्या(एस.सी) विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण साळवे यांनी विद्युत पुरवठा स्वतंत्र करण्याच्या मागणीचे लेखी निवेदन महाविज वितरण कंपनीला देवून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

नेवासा फाटा येथील विद्यूत पुरवठा स्वतंत्र करण्यासाठी अंदाज पत्रकाला मंजूरी मिळणार असून लवकरच काम सुरु होणार असल्याचा आशावादही चेचर यांनी व्यक्त केला. यावेळी उपकार्यकारी अभियंता चेचर यांचा नेवासा फाटा येथील व्यावसायिक व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र उंदरे, ग्रामपंचायत सदस्य गणेश माटे, राजेंद्र वाघमारे, ज्ञानेश सिन्नरकर, विजय गायकवाड, शिवसेना शाखा प्रमुख गणेश झगरे आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com