कापसाला भाव मिळेल तर दिवाळीदरम्यान पाऊस

पाचेगावच्या होईकातील भाकित ऐकण्यासाठी परिसरातील भाविकांची गर्दी
कापसाला भाव मिळेल तर दिवाळीदरम्यान पाऊस

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगावमध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून वीरभद्र बिरोबा देवस्थानच्या समोर दसरा सणाच्या तिसर्‍या दिवशी हे होईक सांगितले जाते, यात गावातील व पंचक्रोशीतील भाविकांनी होईक ऐकण्यासाठी गर्दी केली होती.

या वीरभद्र बिरोबा देवस्थान समोर होईकामध्ये यंदा पांढरे सोन्याला सोन्याचा भाव मिळेल, दिवाळीच्या दरम्यान पाऊस पडेल, भविष्यात जनावरांना पीडा राहीन, राज्यात सत्तेत बदल घडून येतील, भविष्यात थंडीची लाट उसळली जाईल, तर उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता जास्त प्रमाणात दिसून येईल. जूनमध्ये वेळेवर पाऊस पडून वेळेवर शेतीची मशागत होत पेरण्या होतील. तरुणपिढी भरकटत आपल्या आई-बापांना विचारणार नाही असे भाकीत गावातील कुशीनाथ बाबा कर्डिले व लक्ष्मण भुसारी यांनी केले

यावेळी भगवान राशीनकर, विष्णू मतकर, गंगाधर मतकर, काशिनाथ मतकर, पुरुषोत्तम भुसारी, अशोक कर्डीले, भाऊराव कर्डिले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com