हिवरेबाजारमध्ये डंपरव्दारे वाहतुकीवर बंदी

गौणखनिज वाहतूकबाबत नवीन नियमावली
हिवरेबाजारमध्ये डंपरव्दारे वाहतुकीवर बंदी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये रविवारी महाराष्ट्र दिनी (दि. 1) झालेल्या ग्रामसभेत गावात जमीन सपाटीकरण (सुधारणा) करणे, गौणखनिज उत्खन्न व वाहतूक करण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या या ग्रामसभेत गावातील रस्ते वाचवण्यासाठी डंपरवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच जमीन सुधारणा करण्यासाठी केवळ ट्रॅक्टरचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली. यावेळी नगरचे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, नगरचे तहसीलदार राजेंद्र पाटील यांच्यासह अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थितीत होते. ग्रामसभेत हिवरेबाजार गावात जमिनीची सुधारणा करतांना काळी माती व इतर गौणखनिज वाहतुकीसाठी ट्रॅकटरचा वापर करण्यात यावा. जड वाहतुकीमुळे रस्ते खराब होतात म्हणून ढंपरचा वापर न करणे. या कामांमुळे यापूर्वी करण्यात आलेल्या जलसंधारण, मृदसंधारण आणि वनसंवर्धन कामास नुकसान होणार नाही अथवा अशा कामामधून निर्माण झालेल्या स्ट्र्कचर्स यांचे नुकसान होणार नाही, त्यांना कोणतीही बाधा येणार याची दक्षता घेण्यात येणार आहे.

गावासाठी नवीन निमावलीचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकर्‍यांची अडवणूक न होता ताबडतोब परवानगी देऊन पुढील काम लवकरात लवकर सुरू व्हावे. गावात जड वाहतुकीमुळे रस्ते खराब होतात म्हणून ढंपरचा वापर बंद करावा. नवीन घरांच्या बांधकामासाठी किंवा रस्ते डांबरीकरणाच्या कामांसाठी ही अट शिथिल करण्यात आली असून शेतकर्‍याने परवानगीसाठी अर्ज सादर केल्यावर ग्रामपंचायतीने 7 दिवसांच्या आत परवानगी न दिल्यास परवानगी आहे, असे समजून काम सुरू करण्यास काही हरकत नाही असे समजण्यात येईल.

भविष्यकाळातील 25 वर्षानंतरचे वीजटंचाई लक्षात घेता गावात कृषिपंपासाठी सौरऊर्जा प्रकल्पावर अधिक भर द्यावा, यासाठी पद्मश्री पवार यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच घरपट्टी फेरआकारणी बाबत शासन निर्णयानुसार आकारणी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक कुटुंबाला शुद्ध व स्वचछ पाणी कसे देता येईल यावर चर्चा झाली. गावातील वडजूबाई माता व गणेश मंदिर चोपाळा या अपूर्ण काम मुंबादेवी यात्रा लीलावतील 2 लाख 90 हजार रकमेतून पूर्ण करण्याचे ठरले. यावेळी सरपंच विमल ठाणगे सरपंच, हरिभाऊ ठणगे (सर), एस.टी.पादिर (सर), रामभाऊ चत्तर, रो.ना.पादीर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.