पोपटराव पवार सक्रिय; नगरमधील 'या' स्थितीबाबत केली मंत्री, नेत्यांशी चर्चा

पोपटराव पवार सक्रिय; नगरमधील 'या' स्थितीबाबत केली मंत्री, नेत्यांशी चर्चा

अहमदनगर ( प्रतिनिधी) -

सध्या करोनाची स्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे. रुग्ण आणि नातेवाईक असुविधेमुळे हैराण आहेत. औषध, बेड, ऑक्सीजनचा तुटवडा आहे. प्रशासन याबाबत योग्य माहिती देत नसल्याने स्थिती अधिकच चिंताजनक आहे.

हा सार्वत्रिक अनुभव असताना जिल्ह्यातील नेते कोविड राजकारणात व्यस्त आहेत. जनतेला वाली नाही अशा स्थितीत आदर्शगाव योजनेचे मार्गदर्शक पोपटराव पवार मैदानात उतरले आहेत. नगरकरांना आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून त्यांनी थेट राज्याचे नेते, प्रशासकीय अधिकारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली.

कालपासून त्यांनी नगर शहरातील मॅककेअर, नोबल, सुरभी, साईदीप सह सरकारी रुग्णालयाची माहिती प्रत्यक्ष भेट देऊन जाणून घेतली. यावेळी परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून आले.

त्यानंतर त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, डॉ.तात्याराव लहाने या मान्यवरांना या परिस्थितीशी अवगत करून नगर जिल्ह्यासाठी मदत मागितली. प्रशासनाने या काळात संवेदनशील असले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com