हिवरगावपावसा टोल नाक्यावर बेकायदा पैसे वसुली
File Photo

हिवरगावपावसा टोल नाक्यावर बेकायदा पैसे वसुली

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

नाशिक-पुणे रोडवरील संगमनेर तालुका हद्दीतील हिवरगावपावसा टोल नाक्यावर बेकायदा पैसे वसुली होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने उपविभागीय अधिकारी, संगमनेर यांना निवेदन दिले आहे. आठ दिवसांत टोल नाका प्रशासनाने तोडगा न काढल्यास टोल बंद आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नाशिक-पुणे हायवे वरील संगमनेर तालुका हद्दीतील मौजे हिवरगाव पावसा याठिकाणी असलेल्या टोलनाक्यावर स्थानिकांच्या गाड्यांचा प्रवास ज्या तारखेला झाला. त्यानंतर दुसर्‍या अथवा तिसर्‍या दिवशी पैसे कट झाल्याचा मेसेज (संदेश) प्रवाशाच्या अथवा गाडी मालकाच्या मोबाईलवर येत आहे, असे प्रवासानंतर दुसर्‍या अथवा तिसर्‍या दिवशी पैसे कसे व कोण कट करते याची चौकशी करून लेखी उत्तर देण्यात यावे. तसेच जर स्थानिकांना टोल मध्ये सवलत देण्याचे ठरलेले असतानाही पैसे परस्पर कापले जात आहेत व सदर हायवे ज्या रोडसाठी टोल आकारात आहे, त्या रस्त्याच्या कामात अनेक त्रुटी असून अनेक ठिकाणी कार्यादेशात दिल्यानुसार काम झालेले नाही.

याबाबत आपल्या कार्यालात आपण संबंधित रोडचे ठेकेदार अथवा व्यवस्थापक व संगमनेर शहर व तालुक्यातील मोजक्या प्रतिनिधींची बैठक येत्या आठ दिवसांत निश्चित करावी व त्या बैठकीस सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना निमंत्रित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. आठ दिवसांत बैठक घेऊन तोडगा न निघाल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने कोणत्याहीक्षणी टोल बंद आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, संगमनेर तालुकाध्यक्ष अक्षय भालेराव यांची स्वाक्षरी आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com