सरकारने हिरडा व जंगली माल खरेदी करावा अन्यथा जन आंदोलन

वैभव पिचड यांचा इशारा || वैयक्तिक टीका टिप्पणी करणे हाच त्यांचा विकासाचा अजिंठा
सरकारने हिरडा व जंगली माल खरेदी करावा अन्यथा जन आंदोलन

अकोले |प्रतिनिधी| Akole

हिरडा (Hirda) खरेदी केंद्र तातडीने सुरू करून सरकारने हिरडा (Hirda) व जंगली माल (Wild Goods) खरेदी करावा अन्यथा रस्त्यावर उतरून जन आंदोलन करण्याचा इशारा (Movement Hint) भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री तथा माजी आमदार वैभव पिचड (Former MLA Vaibhav Pichad) यांनी दिला.

तालुक्यात हिरडा (Hirda) खरेदी केंद्र सुरू नाही, खावटी वाटप नाही, ठक्कर बाप्पा योजना बंद, वैयक्तिक लाभाच्या योजना, शबरी महामंडळ योजना बंद (Shabari Mahamandal Scheme Closed), भात खरेदी (Buy Rice) याबाबत राज्य सरकार व तालुक्याचे लोकप्रतिनिधी गप्प असून सामाजिक कामाचा टेंभा मिरविणारे याकडे लक्ष देत नसून केवळ वैयक्तिक टीका (Criticism) टिप्पणी करणे हाच त्यांचा विकासाचा अजिंठा असल्याची टीका (Criticism) माजी आमदार पिचड (Former MLA Vaibhav Pichad) यांनी विद्यमान लोकप्रतिनिधी डॉ. किरण लहामटे (MLA Dr. Kiran Lahamate) यांचे नाव न घेता केली.

अकोले तालुक्यातील (Akole Taluka) आदिवासी भागात (Tribal Part) हिरडा (Hirda) गोळा करण्याचे काम सुरू असून आदिवासींना मात्र खरेदी केंद्र सुरू नसल्याने व्यापारी वर्गाला कमी भावात आपला जंगली माल द्यावा लागतो त्यात काटे मारण्याचे प्रकार सुरू असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तर आदिवासी विकास महामंडळ (Tribal Development Corporation) आदिवासी शेतकर्‍यांचा हिरडा खरेदी विक्री करताना दिसत नाही. याबाबत अधिकारी वरिष्ठ कार्यालयाकडे बोट दाखवून गप्प आहेत. याबाबत आदिवासी शेतकर्‍यांचे शिष्ट मंडळ आज भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री व माजी आमदार वैभव पिचड याना भेटले.

व हिरडा खरेदी केंद्र सुरू नसल्याने हिरडा जंगली वनोपज खनिजे पडून आहेत. तसेच खावटी योजना बंद पडली आहे.ठराविक लोकांनाच ती दिली जाते, आदिवासी विकास विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना थांबल्या आहेत, शबरी महामंडळ मर्यादित योजनांचा बोजवारा उडाला असून आदिवासींना स्वतंत्र आर्थिक बजेट असताना कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे तरी देखील आदिवासी समाजाला न्याय मिळत नाही. भात खरेदी अनुदान अद्याप मिळाले नाही. याबाबत सुरेश भांगरे, सयाजी अस्वले, विजय भांगरे, गंगाराम धिंदले, भरत घाणे, सुरेश गभाले, पांडुरंग भांगरे आदींच्या तक्रारी ऐकून घेत माजी आमदार पिचड यांनी पत्रकारांशी संवाद साधत तालुक्याचे लोकप्रतिनिधी करतात काय? असा सवाल उपस्थित करत ज्या आदिवासी क्षेत्राने आपणाला निवडून दिले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com