हिरडगावमध्ये सात लाखांची चोरी
सार्वमत

हिरडगावमध्ये सात लाखांची चोरी

चोरट्यांनी बेंटेक्स समजून दोन तोळ्यांचा दागिना दिला फेकून

Arvind Arkhade

श्रीगोंदा|तालुका प्रतिनिधी|Shrigonda

हिरडगाव येथे भास्कर आबासाहेब भुजबळ (भुजबळ वस्ती) यांच्या घरी रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास मोठी चोरी झाली. यात दोन लाख 30 रुपये रोख व सुमारे 13 तोळे 660 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा सहा लाख 82 हजारांचा ऐवज चोरांनी लांबविला.

श्रीगोंदा तालुक्यात चोरटे सध्या रात्रीच्या वेळी धुमाकूळ घालत असताना हिरडगाव येथील भुजबळ वस्ती वर राहणार्‍या भास्कर भुजबळ यांच्या घराचा अज्ञात चोरट्यांनी दरवाजा कटावणीने उघडून घरात प्रवेश केला. घरातील झोपलेल्या लोकांना ओलांडून कपाटामध्ये असणारा सर्व ऐवज चोरट्यांनी लांबविला.

रात्री दोन अडीचच्या दरम्यान हिरडगावच्या भुजबळ वस्तीवर भास्कर आबासाहेब भुजबळ यांच्या घरी झालेल्या चोरीमध्ये काही बेंटेक्स बांगड्या होत्या व त्याबरोबर दोन तोळ्यांचा पुणे येथे खरेदी केलेला एक सोन्याचा हार होता; परंतु तो फिकट पिवळा असल्यामुळे तो हार बनावट समजून बेंटेक्स च्या बांगड्या बरोबर चोरांनी शिवाजी भुजबळ यांच्या वीटभट्टी जवळ टाकून दिला.

दरम्यान अहमदनगर येथून श्वानपथक आले. पथकाने चोर गेलेला मार्ग दाखवला. पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव अन्य पोलिसांसह घटनास्थळी उपस्थित आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com