महामार्गावर करायचे लुटमार, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

चौघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात
महामार्गावर करायचे लुटमार, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अहमदनगर|Ahmedagar

महामार्गावरील (Highway) वाहन चालकांना शस्त्राचा धाक (Fear of Arms) दाखवून लुटमार (Robbery) करणारी सराईत गुन्हेगाराची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने गजाआड केली. नितीन मच्छिंद्र माळी (वय 22 रा. मोरे चिंचोरे ता. राहुरी), गणेश रोहिदास माळी (वय 21 रा. खडकवाडी ता. राहुरी), रवी पोपट लोंढे (वय 22 रा. घोडेगाव ता. नेवासा), निलेश संजय शिंदे (वय 21 रा. पारिजात चौक, नगर) असे अटक (Arrested) केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांचा एक अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले असून अजून चार सराईत गुन्हेगार पसार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके (Police Inspector Anil Katke) यांनी दिली.

अटक (Arrested) केलेल्या आरोपींकडून चार गुन्ह्यातील तीन दुचाकीं, एक मोबाईल असा एक लाख 95 हजारांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे. 4 ऑगस्ट रोजी दिलीप तमनर (रा. तमनर आखाडा ता. राहुरी) हे मनमाड रोडने (Manmad Road) घरी जात असताना त्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्यात आले होते. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यासह नगर-मनमाड (Nagar-Manmad), नगर-पुणे (Nagar-Pune), लोणी-संगमनेर (Loni Sangamner) या महामार्गावरील लुटीच्या गुन्ह्याचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी एलसीबी निरीक्षक अनिल कटके (LCB Anil Katake) यांना दिल्या होत्या.

त्यानुसार निरीक्षक कटके (LCB Anil Katake) यांनी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे (Assistant Inspector of Police Somnath Divate), उपनिरीक्षक गणेश इंगळे (Sub-Inspector Ganesh Ingle), पोलीस कर्मचारी दत्तात्रय गव्हाणे (Police personnel Dattatraya Gavhane), मनोहर गोसावी, शंकर लोढे, विशाल दळवी, शंकर चौधरी, दिपक शिंदे, जालिंदर माने, आकाश काळे, राहुल सोळुंके, सागर ससाणे, रणजित जाधव, रोहित यमूल, सागर सुलाणे, मच्छिंद्र बर्डे, उमाकांत गावडे, बबन बेरड यांचे पथक स्थापन केले. या पथकाने सुरूवातीला नितीन माळी व गणेश माळी यांना राहुरी (Rahuri) परिसरात अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबूली देताच रवी लोंढे, निलेश शिंदे यांना घोडेगाव (Ghodegav) परिसरातून अटक (Arrested) केली. एक अल्पवयीन साथीदार ताब्यात घेतला असून अजून त्यांचे चार साथीदार पसार आहेत, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

लुटीचे सात गुन्हे उघडकीस

अटक केलेल्या चार आरोपींनी जिल्ह्यातील सात ठिकाणी चोरी, लुटमार, दरोड्याचे गुन्हे केले असल्याची कबूली पोलिसांसमोर दिली. यामध्ये सुपा पोलीस ठाण्यातील चोरी, राहुरी पोलीस ठाण्यातील चार जबरी चोरी व एक दरोडा आणि संगमनेर पोलीस ठाण्यातील एक जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. यातील चार गुन्ह्यात चोरी केलेल्या तीन दुचाकी व एक मोबाईलही पोलिसांनी जप्त केला आहे. या सराईत गुन्हेगाराच्या टोळीचा प्रमुख पसार आहे. त्याच्याविरोधात दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, फसवणूक, बेकायदा हत्यार बाळगणे, चोरी असे 27 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com