शिर्डीतून जाणारा महामार्ग सुशोभीकरणासाठी 30 कोटींचा निधी उपलब्ध करणार - गडकरी

शिर्डीतून जाणारा महामार्ग सुशोभीकरणासाठी 30 कोटींचा निधी उपलब्ध करणार - गडकरी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाच्या सुशोभीकरणासाठी 30 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

मंत्री नितीन गडकरी यांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी उतर नगर जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत गडकरी यांचे लक्ष वेधले. शिर्डी शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी खा. विखे यांनी मंत्री गडकरी यांना विनंती केली.

शिर्डी तीर्थक्षेत्राचा विचार करता देश विदेशातील भाविक दर्शनासाठी येतात. शहराच्या सुशोभीकरणासाठी नगरपंचायत प्रयत्न करीत असतेच परंतु केंद्र सरकारने अधिकचा निधी दिल्यास शहर विकासाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल. ही बाब खा. विखे यांनी ना. गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली.

शहरातून जाणार्‍या या मार्गाच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव तयार करून तातडीने पाठवा, तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करतो, अशी ग्वाही मंत्री गडकरी यांनी दिली. याप्रसंगी नगरपंचायतीच्यावतीने गडकरी यांचा सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com