जिल्ह्यात 'या' बाजार समितीमध्ये कांद्याला उच्चांकी भाव

घोडेगाव मार्केट कमितीमध्ये 19000 कांदा गोणीची आवक झाली होती
जिल्ह्यात 'या' बाजार समितीमध्ये कांद्याला उच्चांकी भाव

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा (agricultural produce market committe newasa) उपआवार घोडेगाव येथे बुधवारी झालेल्या कांदा लिलावात प्रातिं क्विंटल 2335 रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला. घोडेगाव मार्केट

समितीमध्ये 19000 कांदा गोणीची आवक झाली होती.कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 2335 रुपयांपर्यंत भाव निघाला.

तर श्रीरामपूर बाजार समितीच्या कांदा बाजार मध्ये बुधवारी 9816 कांदा गोण्यांची आवक झाली. उत्तम प्रतीच्या कांद्याला 2400 रुपये पर्यंत बाजार भाव मिळाला,गेल्या आठवड्यात हे भाव एक हजार रुपयांवर गेले होते. मात्र आवक कमी झाल्याने बाजार भाव काही प्रमाणावर वाढले आहे.

उत्तम प्रतीच्या कांद्याला 1900 ते 2400 रुपये, दोन नंबर कांद्याला 1000 ते 1850 रुपये, तीन नंबर कांद्याला 100 ते 950 रुपये तसेच गोल्टी कांद्याला 1200 ते 1800 रुपये पर्यतचा भाव मिळाला.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com