हायकोर्टाने पोलीस अंमलदार निपसेचा जामीन नाकारला

हायकोर्टाने पोलीस अंमलदार निपसेचा जामीन नाकारला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लाच मागणी पडताळणीदरम्यान व्हॉईस रेकॉर्डर बळजबरीने घेवून पळालेला पोलीस अंमलदार एकनाथ पंडीत निपसे याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने नामंजूर केला आहे.

50 हजार रूपयांची लाच मागणी करणे, लाच मागणी पडताळणी दरम्यान व्हॉईस रेकॉर्डर घेऊन पळणे यावरून अंमलदार निपसे विरोधात 17 फेब्रुवारी 2023 रोजी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7, मा.वि.क. 392, 201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून निपसे हा पसार होता. गेल्या काही दिवसांपूर्वी तो लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नगर कार्यालयात हजर झाला होता.

त्याला सुरूवातीला चार व नंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंतर त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केली होती. येथील न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नामंजूर केल्यानंतर त्याने छत्रपती संभाजीनगर येथे वकिलामार्फत अर्ज केला होता. त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जामीन मंजूर न करण्यासाठी सविस्तर म्हणणे सादर केले होते.

तसेच सरकारी वकील एस. पो. सोनपावले यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने निपसे याचा जामीन अर्ज नामंजूर केला असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com