बगाटे यांना उच्च न्यायालयाची नोटीस

परवानगी न घेता 25 कोटींची बिले परस्पर अदा केली
बगाटे यांना उच्च न्यायालयाची नोटीस

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानचे (Sai Baba Trust) तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे (then Chief Executive Officer Kanhuraj Bagate) यांनी तदर्थ समिती व उच्च न्यायालयाची (High Court) परवानगी न घेता जवळजवळ 25 कोटी रुपयांची बिले परस्पर अदा केल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे (Sanjay Kale) यांनी औरंगाबाद (Aurangabad) येथील उच्च न्यायालयाचा (High Court) अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल केली असून सदर याचिकेची काल दि. 11 रोजी सुनावणी झाली असून श्री. बगाटे यांना नोटीस काढली असल्याचे याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. अजिंक्य काळे (ADVT Ajikya Kale) यांनी सांगितले.

याबाबत याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड.अजिंक्य काळे (ADVT Ajikya Kale) यांनी माहिती देताना सांगितले की, सन 2019 मध्ये सामाजिक कार्यकर्ते संजय काळे (Sanjay Kale) यांनी दाखल केलेल्या एका याचिकेत संस्थानच्या विश्वस्त व्यवस्थेला केवळ दैनंदिन खर्च करण्याची परवानगी दिली होती. जनहित याचिका 120/2019 मध्ये न्यायालयाने चार सदस्यांच्या तदर्थ समितीचे गठण केले. यामध्ये प्रधान जिल्हा न्यायाधीश यांना समितीचे अध्यक्ष करण्यात आले.

ऑगस्ट 2020 मध्ये संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कान्हूराज बगाटे (Kanhuraj Bagate) यांची नियुक्ती झाली. श्री. बगाटे यांनी तदर्थ समिती व उच्च न्यायालयाची (High Court) परवानगी न घेता जवळजवळ 25 कोटी रुपयांची बीले परस्पर न्याती कन्स्ट्रक्शन व भानू कन्स्ट्रक्शन व इतरांना अदा केल्याबाबतची माहिती संजय काळे यांना माहितीच्या अधिकारात मिळाली. सदरच्या विषयाबाबत श्री. काळे यांनी उच्च न्यायालय (High Court) खंडपीठ औरंगाबाद (Aurangabad) येथे उच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल केली आहे.

सदर याचिकेत काल सोमवार दि. 11 ऑक्टोबर रोजी सुनावनी झाली. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत श्री. बगाटे यांना सदर अवमान याचिकेत नोटीस काढली असल्याचे म्हटले आहे. पुढील सुनावणी आठ आठवड्यांनी ठेवण्यात आली असून सदर याचिकेत याचिकाकर्ते यांचे वतीने अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर व अ‍ॅड. आजिंक्य काळे यांनी काम पाहिले.

Related Stories

No stories found.