अहमदनगर (प्रतिनिधी) -

महापालिकेच्या चार कर्मचार्यांचा करोना संसर्ग विषाणूमुळे दुदैवी मृत्यू पावणार्या त्यांच्या कुटुंबातील वारसांना मनपा कर्मचारी

कल्याण निधीतून प्रत्येकी एक लाख रूपयाची आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त डॉ.श्री.प्रदिप पठारे, सभागृह नेते मनोज दुलम, ज्येष्ठ नगरसेवक रामदास आंधळे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, निखील वारे, अनंत लोखंडे, शेखर देशपांडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना महापौर वाकळे म्हणाले, करोना संसर्ग विषाणूने संपूर्ण देशामध्ये थैमान घातला असल्याने आपल्या सरकारने संपूर्ण देश लॉकडॉऊन केला. या लॉकडॉऊनच्या काळामध्ये अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचार्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले करोना विषाणू हा संसर्ग असल्यामुळे एक व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना करोना संसर्ग होण्याची भिती मोठया प्रमाणात होती.

यात जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत असताना मनपाच्या चार कर्मचारी पाणी पुरवठा विभागाती एक आरोग्य विभागातील दोन व मलेरिया विभागातील एक अशा एकूण चार कर्मचार्यांचा करोना संसर्ग विषाणूमुळे दुदैवी निधन झाले. त्यांच्या कुटुंबातील वारसांना महानगरपालिका कर्मचारी कल्याण निधीतून प्रत्येकी एक लाख रूपयाची आर्थिक मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्मचारी कल्याण निधी मार्फत वर्षभर कर्मचार्यांचे आर्थिक मदत करण्याचे काम केले जात आहे. तसेच कर्मचार्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. करोना संसर्गाच्या काळामध्ये मनपाच्या कर्मचा-यांचा दुदैवी मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:ख कोळसले. कर्मचारी कल्याण निधी मार्फत छोटीशी मदत करण्याचे काम केले असल्याचे उपायुक्त डॉ.पठारे यांनी सांगितले.